Posts

चिकित्सेचं 'प्रश्नचिन्ह' आणि अंधभक्तीचे पूर्णविराम

Image
छायाचित्र सौ.- एबीपी माझा         विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राजकीय व्यासपीठांवर पुन्हा एकदा मतामतांचा धुरळा उडाला. एबीपी माझा या वाहिनीने 'सावरकर...नायक की खलनायक?' या चर्चेचं आयोजन केलं आणि एका नव्या सामाजिक माध्यमवादाला तोंड फुटलं. फेसबुकवर मोठ्यामोठ्या पोस्टी पडल्या, एबीपी माझावर टीकेची झोड उठली आणि त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची जणू मोहीमच सुरू झाली. याची वाहिनीने थोड्या जास्तच गंभीरतेने दखल घेतली आणि सारवासारव करण्याच्या हेतूने की काय, लगेचच 'आम्ही सावरकरप्रेमी बोलतोय...' असा एक कार्यक्रम घेतला. आता या शीर्षकाचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय'शी असणारं साधर्म्य हा निव्वळ योगायोग समजावा का? हा प्रश्न निराळा.         पहिला मुद्दा, कार्यक्रमाचं नाव, ज्यावर 'तुम्ही सावरकरांना खलनायक म्हणताच कसे?' असा प्रश्न उपस्थित केला गेला. सावरकरांनी अंदमानात फिरवलेला कोलू, देशासाठी केलेला त्याग वगैरे गोष्टी आळवल्या गेल्या. यातल्या प्रत्येकाच्या खोलात आत्ता जाण्यात काही अर्थ नाही, कारण आजचा विषय वेगळा आहे. तर, कार्यक्रमाचं नाव. काय आहे हे ...

'अच्छे दाग' आणि धर्मांधतेचे चष्मे

Image
‘अच्छे दाग’ आणि धर्मांधतेचे चष्मे फोटो सौजन्य: गूगल. सर्फ एक्सेल साबणाच्या एका जाहिरातीवरून काल समाजमाध्यमांवर गदारोळ उसळला आणि एरवी सहजपणे दुर्लक्षित होऊ शकणारी ती जाहिरात असंख्य लोकांनी मुद्दाम शोधून पाहिली. ट्विटरवर BanHindustanUnilever, BoycottSurfExcel असे हॅशटॅग्स ट्रेंड होताना पाहून माझीही उत्सुकता चाळवली. ‘दाग अच्छे है’ ही सर्फ एक्सेलची टॅगलाईन रंगपंचमी, होळीसाठी चपखल बसणारी, त्यामुळे RangLayeSang असा हॅशटॅग वापरून आठवड्याभरापूर्वी यूट्यूबवर  झालेली ही जाहिरात.  एका सोसायटीत मुलं रंग खेळतायत. पांढरेशुभ्र कपडे घातलेली एक मुलगी सायकलवरून येते, मुलं तिच्यावर मनसोक्त रंग टाकतात, पिचकाऱ्या, फुग्यांनी तिला पूर्ण रंगवून सोडतात. तीही त्यांना चिडवल्यासारखं करत मजा लुटते. शेवटी रंग संपून जातात, पाणी, फुगे, सगळंच संपतं. ती मुलगी परत येऊन एका छोट्या मुलाला हाक मारते. डोक्यावर पांढरी टोपी आणि तसेच कपडे चढवलेला तो मुलगा तिच्यामागे सायकलवर स्वार होतो. ती त्याला मशिदीपाशी आणून सोडते. आत जाता जाता मागे वळून तो म्हणतो, “नमाज पढ़ कर आता हूँ l” “बाद में रंग पड़ेगा l” ती उत्तरते...

१३३ वर्षांची 'डॉक्टर आनंदी'

Image
१३३ वर्षांची ‘डॉक्टर आनंदी’                    आनंदीबाई जोशींना मेडिकल कोलेज ऑफ पेन्सिल्वेनियाची एम्. डी. पदवी मिळून आज १३३ वर्षं झाल्याचं वाचलं आणि नुकत्याच पाहिलेल्या ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटातला एक प्रसंग डोळ्यासमोर आला. आपलं तान्हं बाळ केवळ उपचार उशिरा मिळाल्यामुळे गेलेलं, सुन्न होऊन बसून राहिलेल्या आनंदीला समजावणारे गोपाळराव आणि एका क्षणी कुठल्याशा अनामिक जिद्दीने ‘मी डॉक्टर होऊन दाखवीन.’ अशी शपथ घेणारी आनंदी.         सुमारे १५० वर्षांपूर्वीचा तो काळ. समाजात तथाकथित उच्च समजल्या जाणाऱ्यांचं ते घर आणि अशा घरात राहून इतकं धाडसी स्वप्न बघणारी तरुण आनंदी. मुलीचं शाळेत पडलेलं पाऊलही ज्या समाजाच्या दृष्टीने अपशकुनी आणि धर्मबुडवं, तिथे सातासमुद्रापार जाऊ बघणाऱ्या आनंदीच्या वाटेतल्या अडथळ्यांची कल्पनाच करावी फक्त. चित्रपटात तिच्या घरासमोर कचरा फेकणारे, तिला शिव्यांची लाखोली वाहणारे लोक हे याच समाजाचे प्रतिनिधी. या सगळ्याला पतीच्या साथीने का होईना, पण एक स्त्री म्हणून तोंड देत देत आपलं स्वप्न जिद...